Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे संत महंतांचे मंगल आगमन

चांदवड येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे ' पंचायती महानिर्वाणी आखाडा ' चे संत-महंत...  महामंडलेश्वर स्वामी विद्यागिरीजी महाराज व तृतीय चंद

विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते
हरितक्रांतीचे जनक थोर शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचं ९८ व्या वर्षी निधन
तिडके पाटील विद्यालयाचा दहावीचा 98.88 टक्के निकाल

चांदवड येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे ‘ पंचायती महानिर्वाणी आखाडा ‘ चे संत-महंत…  महामंडलेश्वर स्वामी विद्यागिरीजी महाराज व तृतीय चंद्रेश्वरबाबा महंत स्वामी बन्सीपुरीजी महाराज यांच्या समवेत महंत लक्ष्मीनारायणपुरीजी महाराज  , स्वामी विवेकपुरीजी महाराज , स्वामी महेशपुरीजी महाराज , स्वामी चमनगिरीजी महाराज , स्वामी सत्यानंदपुरीजी महाराज , स्वामी राघवगिरीजी महाराज , आदी संत महंतांचे मंगल आगमन झाले. 

          याप्रसंगी चंद्रेश्वरगडाचे व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरीजी महाराज , स्वामी स्वामी नागराजपुरीजी महाराज , स्वामी गणेशपुरीजी महाराज यांनी संत पुजन करत चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने संतांचे पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात स्वागत केले. 

         श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगडावरील निसर्ग सौंदर्य पाहून सर्व संतांना मनस्वी आनंद झाला. श्री चंद्रेश्वर महादेवास यावेळी रूद्राभिषेक करण्यात आला. प्रथम चंद्रेश्वरबाबा स्वामी दयानंदजी महाराज व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर डॉ स्वामी विद्यानंदजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले व नवनिर्माणाधीन समाधी मंदिर व श्री चंद्रेश्वरी माता मंदिराच्या कामाची पाहणी केली. श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगडावरील विविध विकासकामांबद्दल महंतांनी समाधान व्यक्त केले. व परिसरातील सुख-शांती व पाऊस पाण्यासाठी मंगल कामना करत आशीर्वाद दिले. आज शुक्रवार दिनांक – १३ सप्टेंबर रोजी पहाटे सर्व संतांचे हरिद्वार कडे प्रस्थान झाले. 

           यावेळी संत महंतांना प्रेमाचा निरोप देण्यासाठी श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराचे सर्व भाविक भक्त सहभागी झाले.

COMMENTS