बीड प्रतिनिधी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.डॉ.राजेंद्र गवई यांच्या आदेशाने पक्ष बांधणीसाठी सभासद नोंदणी अभियान व येणार्या

बीड प्रतिनिधी – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.डॉ.राजेंद्र गवई यांच्या आदेशाने पक्ष बांधणीसाठी सभासद नोंदणी अभियान व येणार्या महत्त्वपुर्ण निवडणुकीसाठी बीड जिल्हा शाखेची 1 सप्टेंबर 2023 शुक्रवार रोजी होणार्या बैठकीस उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन पत्रकाद्वारे रिपाईचे जिल्हाध्यक्ष माणिक वाघमारे यांनी केले आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने वाटचाल करणारे राष्ट्रीय नेते डॉ.राजेंद्र गवई यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पक्षाची कार्य देशामधील विविध भागात चालू असून त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन व सभासदन नोंदणी अभियानाचा प्रारंभ मान्यवर राष्ट्रीय कोषागार रामराव दाभाडे, प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष जलील खान, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पंडित टोंम्पे, मराठवाडा कार्याध्यक्ष मिलींद मोकळे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे या बैठकीत येणार्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढता जातीवाद, महिलांवरील अत्याचार यावर देखील चर्चा व मार्गदर्शन होणार आहे आणि पक्षाचे संघटन मजबूत कसे होईल यावर भर दिला जाणार आहे.
तरी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाई चे बीड जिल्हाध्यक्ष माणिक वाघमारे ,कचरु तुपे, बाळासाहेब काकडे, धीरज वडमारे, सुरज भुतके, लखन वडमारे, संजय ठोकळ, भीमराज ठोकळ, देवराज थोरात, अमोल भांगे, अमित गायकवाड,आकाश कांबळे, लक्ष्मण सोनवणे, भिवाजी बनसोडे,अरुण खेमाडे, रणजीत सवाई,इंदूताई खरात, वंदनाताई सरवदे, कमलताई गायकवाड,जयाताई आरकडे, विनाताई आरकडे, मायाताई सवाई, सुरेखाताई वाघमारे,सविताताई गायकवाड, तुषार जोगदंड, नईम आत्तार, मोमीन मतिन,सय्यद अली, प्रदिप उजगरे, भैय्यासाहेब गायकवाड, राहुल वाघमारे, भैय्यासाहेब आरकडे, शिवाजी वाघमारे,आबेद कुरेशी, आत्माराम वाघमारे, नवनाथ वाघमारे, भैय्यासाहेब लोंढे, आनंद बनसोडे, विजय वाघमारे,शेख अफताफ, सुधाकर पंडित, सचिन वाघमारे, राजुभाऊ सोनवणे,केशव पंडित, लखन थोरात, शेख शारेख, शेख इमरान, आनंद सिरसट
COMMENTS