Homeताज्या बातम्यादेश

सत्ताधार्‍यांकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न

राहुल गांधींचा आरोप ; निवडणुकीआधीच आमच्या दोन खेळाडूंना अटक

नवी दिल्ली ः देशात सध्या आयपीएलच्या मॅच सुरू आहेत. पण चुकीच्या पद्धतीने पंचावर दबाव टाकून खेळाडूंना विकत घेतले जात आहे. कर्णधाराला घाबरवून मॅच जि

भाजपने आदिवासींना वनवासी केले – राहुल गांधी
राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, कोर्टाकडून याचिका फेटाळली
मणिपुरमध्ये राहुल गांधींनी घेतली पीडितांची भेट

नवी दिल्ली ः देशात सध्या आयपीएलच्या मॅच सुरू आहेत. पण चुकीच्या पद्धतीने पंचावर दबाव टाकून खेळाडूंना विकत घेतले जात आहे. कर्णधाराला घाबरवून मॅच जिंकल्या जात आहेत. ज्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हटले जाते. सत्ताधार्‍यांकडून मॅच फिक्सिंग सुरू असून, मॅच सुरू होण्याआधीच आमच्या दोन खेळाडूंना तुरूंगात टाकल्याचा गंभीर आरोप काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधार्‍यावर केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्याच्या विरोधात विरोधकांकडून रविवारी दिल्लीत लोकशाही बचाव महारॅली काढण्यात आली होती. या रॅलीला संबोधित करतांना राहुल गांधींनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली.
यावेळी 27 पक्षाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी काँगे्रस नेत्या सोनिया गांधी खासदार शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, प्रियंका गांधी, केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, संजय राऊत, सीताराम येचुरी, आप नेते आतिशी, गोपाल राय, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लाही उपस्थित आहेत.
यावेळी रॅलीला संबोधित करतांना राहुल गांधी म्हणाले की, आता आपल्या पुढे लोकसभेच्या निवडणुका आहेत. मग पंच कोणी निवडले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडले. त्यानंतर मॅच सुरू होण्याच्या आधीच आमच्या दोन खेळाडूंना अटक करत तुरुंगात टाकले. त्यामुळे या निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी दिलेला 400 पारचा नारा हा ईव्हीएम आणि माध्यमांवर दबाव टाकून देखील 180 च्या पुढे जाणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाचे बँक खाते बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. मग देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या पक्षाचे सर्वच्या सर्व खाते बंद केले गेले. आम्हाला लोकांना विविध ठिकाणी प्रचारासाठी पाठवायचे आहे. आम्हाला प्रचाराची मोहीम सुरू करायची आहे. बॅनर्स लावायचे आहेत. पण आमचे सर्व स्रोत बंद केले गेले आहेत. मग ही निवडणूक कशी होत आहे? नेत्यांना धमकावले जात आहे, पैसे देऊन सरकार पाडले जात आहेत. अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. केजरीवाल यांना तुरुंगात टाकले. हेमंत सोरेन यांनाही अटक केली, त्यामुळे हा सर्व मॅच फिक्सिंगचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

अटकेच्या भीतीने घाबरणारे नसून लढणारे ः ठाकरे – आज आम्ही निवडणूक प्रचाराला आलेलो नाही. आमच्या दोन बहिणी हिंमतीने लढत आहेत. कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल यांना साथ द्यायला आम्ही आलो आहोत. मी त्यांना सांगू इच्छितो सगळा देश तुमच्या बरोबर आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रामलीला मैदानावर भाषणाला सुरुवात केली. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना अटक करुन कुणी घाबरेल असे जर भाजपला वाटत असेल तर मी सांगू इच्छितो देशातला प्रत्येक जण घाबरणारा नाही तर लढणारा आहे. हिंमत असेल तर सगळ्या एजन्सीजना घ्या आणि सांगून टाका असे आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी रॅली संबोधित करतांना दिले.

COMMENTS