Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विषबाधा करून जीवे मारण्याचा प्रयत्न

फिर्याद नोंदविण्यास हदगाव पोलिसांची टाळाटाळ

नांदेड प्रतिनिधी - हदगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मौजे कोळी येथील दि.23 रोजी माझ्या पतीला गावातील रमेश जुगनाजी काळे व दुर्गाबाई रमेश काळे राहण

सत्यजीत तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही – नाना पटोले
निधी वाटपावरून नाराजीनाट्य
सत्यजीत तांबेंचा काँग्रेससह थोरांताना दे धक्का !

नांदेड प्रतिनिधी – हदगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मौजे कोळी येथील दि.23 रोजी माझ्या पतीला गावातील रमेश जुगनाजी काळे व दुर्गाबाई रमेश काळे राहणार कोळी यांनी त्यांच्या घरी जेवणाच्या बाणाने बोलवून त्यांनी कट कारस्थान करून माझे पतीस विषारी औषध जबरदस्तीने पाजले व माझ्या पतीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला या आशयाची तक्रार पारूबाई संजय काळे यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे दिली आहे .या घटनेची संताप जनक माहिती अशी की 23 जून रोजी माझ्याच नात्यातील सात ते नऊ लोकांनी जमिनीच्या वादावरून माझ्या पतीस अन्नातून विषबाधा करून मला शारीरिक .मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या उद्देशाने ही कट कारस्थान रचल्याची  तक्रार गाव पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली नाही म्हणून अन्यायग्रस्त महिला यांनी 28 जून 23 रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे तक्रार दिली असल्याची समजते ही महिला आपल्या पतीसह शेतात राहते तर तिची मुले शिक्षणासाठी बाहेरगावी गेली आहेत. या संधीचा फायदा घेऊन पारूबाई काळे यांच्या नात्यातील आठ ते नऊ लोकांनी विविध प्रकारची छळवणूक सुरू केल्याचा निंदनीय प्रकार असून सदरील महिला आपणाला न्याय मिळावा म्हणून  निवघा पोलीस चौकी येथील पोलिसांना विनंती केली तिथेही त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. त्यानंतर हदगाव पोलीस ठाणे तक्रार दिली असता तेव्हा  पोलीस अधिकार्‍यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली यावेळी फिर्यादीस उद्धट होऊन पणे बोलून हाकलून देण्यात आले अशी माहिती पुढे येत आहे. माझ्या पतीचा इलाज नांदेडच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आला याबद्दल ते सर्व लेखी पुरावे आजगाव पोलिसांना दिली असता दिवसांनी फेकून दिले तुला कुठे जायचे ते जा असे बोलून हाकलून दिले आहे. सध्या भोकर येथे आयपीएस विभागीय पोलीस अधिकारी म्हणून  कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कार्यरत आहेत .त्यांच्या कालावधीत ही घटना घटने  दुर्देवी बाब म्हणावे लागेल. अशा बर्‍याच घटना घडल्या तरी हदगाव पोलीस गुन्हा नोंदवत नाही अशा अनेक भानगडी समोर येत आहेत.

COMMENTS