Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगडमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला

रायगड ः शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादर

सर्व सौर योजनांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी : दत्तात्रय पडळकर
मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले ः मुख्यमंत्री शिंदे
या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. भास्कर जाधव यांची भावनिक साद

रायगड ः शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान नवगणे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय चालक देखील जखमी झाला आहे. दरम्यान महाडमध्ये गुरुवारी इंडिया आघाडीची सभा पार पडली. सभेनंतर अनिल नवगणे रात्री आपल्या घरी परतत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. अन् हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.

COMMENTS