Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत पदयात्रेदरम्यान केजरीवालांवर हल्ला ; आपचा आरोप

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास अजूनही अवधी असला तरी, ऐन हिवाळ्यात दिल्लीचे राजकारण तापतांना दिसून येत आहे. दिल्लीचे माजी म

बसवर दगडफेक; २ महिला प्रवासी जखमी | LOK News 24
कोंबड्यामागं धावण पडलं महागात; बहीण-भावाचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
निकाला आधीच झळकले विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास अजूनही अवधी असला तरी, ऐन हिवाळ्यात दिल्लीचे राजकारण तापतांना दिसून येत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काढलेल्या पदयात्रेदरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा गंभीर आरोप आपने केला आहे.
यासंदर्भात आपने शनिवारी पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलतांना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की,भाजपचे घाणेरडे राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, हे दिल्लीच्या जनतेने पाहिले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विकासपुरी पदयात्रेदरम्यान भाजपच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. निवडणुकीत ’आप’ आणि अरविंद केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही, हे भाजपला ठाऊक आहे, म्हणूनच त्यांनी असे घाणेरडे राजकारण केले आहे आणि त्यांना अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची असल्याचा गंभीर आरोप आतिशी यांनी यावेळी केला.
गेल्या महिन्यात दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतलेल्या आतिशी यांनी दावा केला की, भाजपने पक्षाच्या संयोजकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या दोन वर्षांत भाजपने अरविंद केजरीवाल यांना अडचणीत आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला अटक केली.

भाजपने आरोप फेटाळले
आपने केलेले गंभीर आरोप भाजपने फेटाळून लावले. जनता अरविंद केजरीवाल यांना प्रश्‍न विचारत असेल तर त्यांना काय हरकत आहे? आज लोकांनी अरविंद केजरीवाल यांना प्रदूषित पाण्याबाबत प्रश्‍न विचारले. जर लोक त्यांना प्रश्‍न विचारत असतील तर ते याला भाजप पुरस्कृत हल्ला म्हणत आहेत, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.

COMMENTS