नवी दिल्ली ः दिल्लीचे जलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली. आप नेत्यांनी त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले आहे. दिल्लीतील जलसंकटावर आतिशी 21

नवी दिल्ली ः दिल्लीचे जलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली. आप नेत्यांनी त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले आहे. दिल्लीतील जलसंकटावर आतिशी 21 जूनपासून भोगल, जंगपुरा येथे उपोषण करत होत्या. उपोषणामुळे त्यांची तब्बेत खालावली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणातून 100 एमजीडी पाणी पाठवण्याची त्यांची मागणी आहे. करारानुसार हरियाणातून 613 एमजीडी पाणी पाठवावे लागते. हरियाणा सरकार फक्त 513 एमजीडी पाणी पाठवत असल्याचा आतिशी यांचा दावा आहे. त्यामुळे दिल्लीतील 28 लाख लोकांना पाणी मिळत नाही. असा त्यांचा आरोप होता.
COMMENTS