Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळे कारखान्याच्या मयत सभासदाच्या वारसास मदत

आ. आशुतोष काळेंच्या हस्ते भरपाईचा सव्वा दोन लाखाचा धनादेश प्रदान

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील सभासद साहेबराव देवराम औताड

करुणा धनंजय मुंडे यांनी केली नव्या शिवशक्ती पक्षाची घोषणा
संगमनेर मध्ये फॉरेस्ट अधिकाऱ्यांची मक्तेदारी कर्मचाऱ्यास कामावर येण्यास मज्जाव 
सिव्हील सर्जनच्या गाडीने अचानक घेतला पेट…

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील सभासद साहेबराव देवराम औताडे यांचे मोटार सायकल अपघातात अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते दोन लाख पंचवीस हजाराचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या सूचनेनुसार कारखाना व्यवस्थापणाने कारखान्याच्या सभासदांचा न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनीकडून सभासदांची विमा पॉलिसी घेतली आहे. कारखान्याच्या सभासदांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटंबाला आर्थिक मदत व्हावी या उद्देशातून सर्व सभासदांची विमा पॉलिसी काढण्यात आली आहे. कारखान्याचे पोहेगाव येथील सभासद साहेबराव देवराम औताडे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे कारखाना प्रशासनाकडून न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनीकडे मयत सभासदाच्या अपघात संदर्भातील सर्व कागदपत्र सादर केले होते. न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनीने सर्व कागदपत्रांची खातरजमा करून मयत सभासदाच्या वारसाला 2,25,000/ (अक्षरी रुपये दोन लाख पंचवीस हजार मात्र) नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. या नुकसान भरपाईच्या रक्कमेचा धनादेश नुकताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मयत सभासद स्व. साहेबराव देवराम औताडे यांचे वारस त्यांचा मुलगा अजिंक्य साहेबराव औताडे यांना देण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक अनिल कदम, प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी.बी.सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ आदी उपस्थित होते.
फोटो ओळ- कर्मवीर काळे कारखान्याचे सभासद स्व.साहेबराव देवराम औताडे यांचे वारस चिरंजीव अजिंक्य साहेबराव औताडे यांना 2 लाख 25 हजाराचा धनादेश देतांना कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे.

COMMENTS