Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीचा उडणार धुरळा !

27 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याच्या दौर्‍यावर

मुंबई ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम कधी वाजतील यावर चर्चा झडत असतांनाच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच

लोकप्रियतेचा दुसरा अर्थ
चालत्या स्टार बसला अचानक लागली आग LokNews24
आंबेडकरी कार्यकर्त्यांचा गौरव अकोल्यासाठी अभिमानाची बाब ः विजय पवार

मुंबई ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम कधी वाजतील यावर चर्चा झडत असतांनाच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौर्‍यावर येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा धुरळा लवकरच उडण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोग आढावा घेतल्यानंतर राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेवून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या बैठकीमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्‍चित झाल्याची चर्चा असून, त्याला या बैठकीनंतर हिरवा कंदील मिळेल असा दावा केला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग पुढील महिन्यात केव्हाही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागलेत. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांची वाट पाहणार्‍या सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने आपल्या तयारीला वेग दिल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 27 तारखेला महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येऊन सलग दोन दिवस राज्यातील प्रमुख अधिकार्‍यांशी संवाद साधणार आहे. या बैठकीत राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेऊन हे पथक संबंधितांना योग्य ते दिशानिर्देश व सूचना करेल असा अंदाज आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः राज्यातील सणवार व इतर महत्त्वाचे दिवस पाहून या बैठकीत निवडणुकीची तारीख ठरवली जाईल असे सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सर्व जिल्हाधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील आढावा घेतला. निवडणुकीसाठी सर्व जिल्हातील कायदा आणि सुवस्था त्याच मतदानासाठी किती कर्मचारी आहेत, यांची माहिती घेण्यात आली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांसह, उद्धव ठाकरे यांना बर्‍यापैकी यश मिळाले असले तरी, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार याविषयीची उत्सुकता महाराष्ट्रातील नागरिकाला आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यातच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचेही प्रयत्न सुरू असल्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंजकदार होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच होतांना दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

विधानसभेची निवडणूक होणार रंजक – महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला होणार असे चित्र दिसत असले तरी राज्यात तिसरी आघाडी देखील स्थापन करण्यात आली आहे. राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, संभाजीराजे यासोबतच इतर काही नेत्यांनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंजक होईल यात शंका नाही. त्यातच वंचितने 11 उमेदवार जाहीर करून जय्यत तयारी सुरू केली.

COMMENTS