मुंबई: बहुचर्चित अशा आशिया कप २०२२ येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आशिया कप २०२२ चे यजमानपद यंदा श्रीलंकेकडे असून हे सामने यूएई मध्ये खेळवले जा
मुंबई: बहुचर्चित अशा आशिया कप २०२२ येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आशिया कप २०२२ चे यजमानपद यंदा श्रीलंकेकडे असून हे सामने यूएई मध्ये खेळवले जातील. या सामन्यांसाठी प्रत्येक संघाने जोरदार तयारी केली आहे. तर पाकिस्तानसोबतच अनेक संघ देखील यूएईमध्ये दाखल झाले आहेत. आशिया कप साठीचे पात्रता फेरीतील सामने सुरू झाले आहेत. तर गट सामने २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली ही स्पर्धा नेमकी किती संघांमध्ये, किती लढती होत आणि कोणत्या वेळेत खेळवली जाईल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
आशिया कपचे वेळापत्रक– यंदाच्या आशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडे असल्याने हे सामने श्रीलंकेत होणार होते, परंतु घरगुती हिंसाचार आणि आर्थिक दिवाळ खोरीमुळे ते यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. १३ सप्टेंबरला आशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाईल.
COMMENTS