नाशिक : स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते, म्हणजेच मानव जातीचे अस्तित्व स्त्रीपासून आहे असे मानले जाते. म्हणूनच स्त्रीला लक्ष्मीचा मान दिला गेल

नाशिक : स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते, म्हणजेच मानव जातीचे अस्तित्व स्त्रीपासून आहे असे मानले जाते. म्हणूनच स्त्रीला लक्ष्मीचा मान दिला गेला आहे. म्हणूनच नवरात्र उत्सवानिमित्त ९ दिवस स्त्रीचा सन्मान व तीचे आरोग्य अबादीत ठेवण्यासाठी डॉ. बांगर्स स्पर्श वुमन्स हॉस्पीटल आणि आयव्हीएफ सेंटरतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुप्रसिध्द स्त्रीरोग व वंध्यत्व निवारणतज्ञ डॉ. अनिता बांगर व डॉ. एच.वाय.बांगर यांनी दिली. या तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते व लोकज्योती महिला मंडळाच्या उपाध्यक्षा कुमुदिनी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
दि.१५ ते २३ ऑक्टोबर असे ९ दिवस सकाळी १० ते दुपारी 1 वाजेपर्यंत डॉ.बांगर स्पर्श वुमेन्स हॉस्पीटल व आयव्हीएफ सेंटर, सह्याद्री नगर (आश्विन नगर), मुंबई -आग्रा रोड, नाशिक आयोजीत शिबिरामध्ये अनियमित मासिक पाळी, अंगावरून पांढरे पाणी जाणे, पीसीओडीचा त्रास असणे/ गर्भनलिका ब्लॉक असणे, गर्भाशयाच्या समस्या, रजोनिवृत्ती, गर्भावस्था टिप्स आदी समस्यांनी त्रस्त्र असलेल्या महिला या शिबिरामध्ये सहभाग नोंदवू शकतात. या शिबिराच्या मोफत मार्गदर्शनासाठी २३९०८८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
COMMENTS