Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक कोळेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी शनिवार (दि.11) रोजी न

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात धडकला मोर्चा
आ. थोरात यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट
57 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पुर्वतयारी उत्साहपूर्वक

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी शनिवार (दि.11) रोजी नाशिक येथे राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आमदार गोपीचंद पडळकर,नवनाथ पडळकर,बाबासाहेब अल्हाट यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला आहे.
आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कोळेकर यांचा दांडगा जनसंपर्क आणि समाजात मोठे वलय आहे त्यांनी राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केल्यामुळे राजकिय निरिक्षकांच्या चांगल्याच भुवय्या उंचावल्या आहेत धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कोळेकर यांनी लढा पुकारलेला होता धनगर समाजात त्यांचे मोठे प्राबल्य असून त्यांनी अचानक भाजपात प्रवेश केल्यामुळे राजकिय निरिक्षकांच्या चांगल्याच भुवय्या उंचावल्या जात असून भाजपात प्रवेश केल्यामुळे कोळेकर यांना अनेकांकडून सुभेच्छा मिळत असल्याचे कोळेकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

COMMENTS