Homeताज्या बातम्यामनोरंजन

कपाळावर भस्म .. गळ्यात रुद्राक्ष.. लांब केसांत महादेवाच्या रूपात अक्षय कुमार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याचा आगामी चित्रपट 'OMG 2' मुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षयचे चाहते त्याच्या या चित्रपटाची प

क्राईम…थ्रिलर…सस्पेन्स…
सामंथाला उचलून घेत ‘खिलाडी’ अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्री.
17 वर्षांनी अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचं गाणं रिलीज.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘OMG 2’ मुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षयचे चाहते त्याच्या या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. अक्षयनं गेल्या महिन्यातचं त्याच्या या चित्रपटातील पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारिख सांगितली होती. आता या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच अक्षयनं शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षयचा फस्ट लूक पाहायला मिळत आहे. या पोस्टरमुळे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु आहे. त्यावर नेटकरी वेगवेगळी प्रतिक्रिया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा चित्रपटातील लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये अक्षयच्या लांब जटा, गळ्यावर भस्म लावला असून रुद्राक्षची माळ देखील आहे. अक्षय या पोस्टरमध्ये महादेवाच्या लूकमध्ये दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत अक्षयनं कॅप्शन दिलं आहे की “फक्त काही दिवसातच… 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात ओएमजी… लवकरच टीझर येणार तुमच्या भेटीत…”

COMMENTS