Homeताज्या बातम्याकृषी

कापसाला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्याला विकावा लागत आहे कमी भावात कापूस

जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यासह जिल्ह्याभरामध्ये पूर्व हंगामी व हंगामी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते आणि कापसाच मोठ्या प्रमाणावर

राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी : पालकमंत्री
शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली
मुक्रमाबाद परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यासह जिल्ह्याभरामध्ये पूर्व हंगामी व हंगामी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते आणि कापसाच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जात  कापूस लागवडीपासून तर कापूस काढणीपर्यंत शेतकऱ्यांना बरंच संकटांना तोंड द्यावे लागतो कापसावरील अळीचा प्रादुर्भाव रोगाच्या प्रादुर्भाव वातावरण बदलाच्या प्रादुर्भाव असे अनेक समस्यांना तोंड देत तो कापसाचे उत्पन्न घेत असतो यासाठी बरमसाठ खर्च देखील लावत असतो ज्यावेळी कापूस वेचणीला येतो. त्यावेळेस व्यापाऱ्यांकडून मुहूर्ताचा भाव दिवाळीला 14 आणि 15 हजार रुपयांचे भाव दाखवला जातो, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरात कापूस येत असतो. त्या वेळेस त्या कापसाला भाव सात आठ हजाराच्या वर जात नसतो कापसाला लागलेला खर्च, व्याजाने घेतलेले पैसे कर्ज, याची परतफेड व्हावी यासाठी भाव वाढेल या आशेने शेतकरी राजा आपल्या घरामध्ये अडचण सहन करून कापूस साठवून ठेवतो. परंतु कापसाचा भाव वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होताना दिसत असल्याने शेतकरी मात्र संकटात आणि चिंतेत सापडलेला दिसतो अशीच परिस्थिती सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. गेल्या चार महिन्यांपासून भाव वाढेल या अपेक्षाने कापूस घरात भरून ठेवलेला आहे. परंतु भाव काय वाढत नाही.  भाव वाढण्याऐवजी रोज घट होत असल्याने आणि कापूस जास्त दिवस घरात साठवून ठेवल्याने त्यापासून त्वचाला खाज सुटण्याचा प्रमाण आता वाढू लागलेला आहे.  नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी भावात का असेना साठवलेला कापूस विकावा लागत आहे.  कापसाला हमीभाव जर शासनाकडून दिला गेला असता तर व्यापाऱ्यांनी देखील हमीभावाने कापूस खरेदी केला असता परंतु शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनी जावं कोणाकडे हीच खंत आता शेतकऱ्यांपुढे पडलेले आहे. 

COMMENTS