Homeताज्या बातम्यादेश

भारताला धक्का! कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द

निवडणुकाअभावी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून कारवाई

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका न झाल्यामुळे जागतिक कुस्ती महासंघ म्हणजेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासं

सातारा जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या लसीकरणाची मोहिम
वारंवार भीक मागून त्या हॉटेल मालकाचे बिल भागवणार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा
दुषित पाणी रस्त्यावर सोडल्याने आरोग्याचा प्रश्‍न गंभीर; तहसिलदारांना ग्रामस्थांचे निवेदन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका न झाल्यामुळे जागतिक कुस्ती महासंघ म्हणजेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कठोर कारवाई करत सदस्यत्व रद्द केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे आगामी जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना भारताच्या झेंड्याखाली स्पर्धेत सहभाग घेण्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
16 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या ऑलिम्पिक क्वालिफाइड वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना ’तटस्थ खेळाडू’ म्हणून सहभागी व्हावे लागेल. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांचा कार्यकाळ बर्‍याच दिवसांपूर्वी संपला आहे. यानंतर कुस्ती संघटनेच्या निवडणुका घेण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा निवडणुकीच्या तारखा निश्‍चित केल्या. मात्र विविध राज्य कुस्ती संघटनांच्या याचिकांच्या आधारे विविध उच्च न्यायालयांनी निवडणुकीला स्थगिती दिली. याच कारणास्तव कुस्ती संघटनेच्या निवडणुका आतापर्यंत झालेल्या नाहीत. या निवडणुका न झाल्याचा परिणाम आता भारताला सहन करावा लागत आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने 30 मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पत्र पाठवत सांगितले होते की, जर 45 दिवस म्हणजेच 15 जुलैपर्यंत भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक झाली नाही तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द करेल. असे असताना देखील भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली नाही. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका अनेक वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

COMMENTS