Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सौ. मंगल कांबळे बिनविरोध

आज नगराध्यक्षांची अधिकृत घोषणा आणि उपनगराध्यक्ष निवडपाटण / प्रतिनिधी : पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री विक्रमसिं

कामे व्यवस्थीत करा अन्यथा कार्यक्रम : निशिकांत पाटील
बोगस ‘टीईटी’ केलेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या जाणार
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू

आज नगराध्यक्षांची अधिकृत घोषणा आणि उपनगराध्यक्ष निवड
पाटण / प्रतिनिधी : पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीच्या सौ. मंगल शंकर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. बुधवारी आघाडीच्या सौ. अनिता शशिकांत देवकांत यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने सौ. कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष पदाची अधिकृत घोषणा व उपनगराध्यक्ष पदाची आज गुरुवारी निवड होणार आहे. या पदासाठी अनेक नगरसेवक व नगरसेविका इच्छुक असल्याने या पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे .
पाटण नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस तथा पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीच्या 17 पैकी तब्बल 15 सदस्य निवडून आले आहेत. विरोधी शिवसेना तथा राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई गटाला अवघ्या दोन नगरसेविकांवर समाधान मानावे लागले आहे. येथे पाटणकर गटाकडे नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण असल्याने यासाठी पात्र शहर राष्ट्रवादी विकास आघाडीच्या वतीने सौ अनिता देवकांत व सौ मंगल कांबळे या दोघींचे उमेदवारी अर्ज दाखल होते. ना. देसाई गटाकडे पात्र अधिकृत उमेदवार नसल्याने त्या गटाकडून कोणाचाही अर्ज दाखल झाला नव्हता. पाटण आघाडीकडून दाखल दोनपैकी एक अर्ज माघारी निघून नगराध्यक्ष निवड बिनविरोध होणार हे निश्‍चित होते. त्याप्रमाणे बुधवारी सौ. अनिता देवकांत यांनी माघार घेतल्याने सौ. मंगल कांबळे यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली. या निवडीची अधिकृत घोषणा गुरुवारी होईल व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम होईल.
नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने गुरुवारी याची अधिकृत घोषणा व दरम्यानच्या काळात उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया होईल. शहर विकास आघाडीमधून अनुभवाच्या जोरावर प्रमुख दावेदारांमध्ये माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, गतवेळी स्विकृत नगरसेवक असलेले उमेश टोळे, माजी ग्रा. पं. सदस्य राजेंद्र राऊत नव्याने निवडून आलेले जगदीश शेंडे, सागर पोतदार, किशोर गायकवाड, अनुसूचित जातीमधील स्वप्निल माने व अनुसूचित जमातीमधील संतोष पवार इच्छुक आहेत. उपनगराध्यक्ष पदावरही महिलांना संधी दिली तर संधिचं सोनं करू या आत्मविश्‍वासाने सौ. सुषमा मोरे, सौ. संजना जवारी, सौ. सोनम फुटाणे, सौ. संज्योती जगताप, सौ. मिनाज मोकाशी व अनुसूचित जाती महिलामधून निवडून आलेल्या सौ. अनिता देवकांत याही उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी भलेही 14 इच्छुक उमेदवार असले तरी यावेळी महिला नगराध्यक्ष असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने सर्वसाधारणमधून निवडून आलेल्या सहा नगरसेवकांचा प्राधान्याने विचार होईल. या सहापैकी तो भाग्यवान कोण याचा निकाल गुरुवारी दुपारपर्यंत लागेल. शिवसेना तथा ना. देसाई गटाकडून उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली गेली तर त्यांच्याकडे सौ. आस्मा इनामदार व सौ. शैलजा पाटील या दोन नगरसेविका आहेत.

COMMENTS