Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवराय आग्य्राहून सुटले तसे शिंदेंही सुटले !

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्याने नवे वादंग

मुंबई प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याची स्पधार्र् महाराष्ट्रात सुरु झाली असून, राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांसोबत कें

आरोग्य पत्रिकेनुसार पिकांना खते देण्यासाठी जनजागृती सुरू
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत | LOK News 24
भिवंडीला मुंबईहून जादा वीस लाख लीटर पाणी

मुंबई प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याची स्पधार्र् महाराष्ट्रात सुरु झाली असून, राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी तुलना केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता. तो वाद संपत नाही तोच, बुधवारी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज जसे आग्रयाहून सुटले तसेच शिंदेही सुटले असे वक्तव्य करून, शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरुन सुटकेची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केल्याने नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना केल्याने मोठा वाद निर्माण होऊ शकतो. एकीकडे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात वाद पेटला असतानाच, आता दुसरीकडे मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. प्रतापगडावर बुधवारी 363 वा शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह शिंदे फडणवीस सरकारमधील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. त्यांच्यानंतर पर्यटनमंत्री मंगप्रभात लोढा यांनी सुद्धा भाषण करत उपस्थितांना संबोधित केले. प्रतापगडावरील उपस्थिताना संबोधित करताना मंगलप्रभात लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगाजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा बंदीस्त केले होते. त्यावेळी शिवाजी महाराज हे स्वत: साठी नाही तर हिंदवी स्वराज्यासाठी युक्ती काढत सुटका करून घेतली. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे सरकार स्थापन झाले, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप – मंगलप्रभात लोढा यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे हे वक्तव्य चुकून आलेले आहे किंवा भाषणाच्या ओघात त्यांनी अशी तुलना केली, असे मी मानत नाही. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपचा हा एक प्लॅन आहे. महाराजांचा अपमान हा भारतीय जनता पक्षाचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

COMMENTS