Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ऑनलाइन टास्क’ देत तब्बल 200 कोटींचा गंडा

पुणे ः ऑनलाइन काम देण्याच्या बहाण्याने देशभरातील सुशिक्षित नागरिकांना तीन महिन्यांत तब्बल 200 कोटींचा गंडा घालणार्‍या टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे

CSR फंडाचे आमिष दाखवून गावकऱ्यांची फसवणूक | LokNews24 |
खोट्या पार्किंगच्या नावाखाली लाखोची फसवणूक
डॉक्टर म्हणून आला आणि पैशांचा गंडा घालून गेला

पुणे ः ऑनलाइन काम देण्याच्या बहाण्याने देशभरातील सुशिक्षित नागरिकांना तीन महिन्यांत तब्बल 200 कोटींचा गंडा घालणार्‍या टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पिंपरी-चिंचवडच्या एका महिलेची सुमारे 72 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार आल्यामुळे हा ‘ऑनलाइन टास्क’ घोटाळा उघडकीस आला.
ऑनलाइन काम देऊन आधी संबंधिताच्या बँक खात्यावर थोडे पैसे द्यायचे. नंतर अधिक काम देऊ, असे सांगून त्यासाठी पैसे घ्यायचे व नंतर बँक खाते बंद करून टाकायचे, अशी मोडस ऑपरेंडी असलेल्या या टोळीचे देशभरातील 17 गुन्हे उघडकीस आले. लोकांना गंडवण्यासाठी या टोळक्याने 95 बनावट खाते उघडल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली. त्यात 13 आरोपी राजस्थानचे तर एक मध्य प्रदेशातील आहे. ऑनलाइन टास्क फ्रॉडप्रकरणी आतापर्यंतची देशभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंजवडी ठाण्यात एका महिलेने ऑनलाइन टास्कद्वारे तिची 71 लाख 82 हजार 520 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट चारने त्याचा तपास सुरू केल्यानंतर एकेक घोटाळा समोर येत गेला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी तब्बल 95 बनावट बँक खाते उघडले होते. या बँक खात्यांमधून तब्बल 200 कोटींचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील फसवणूक झालेल्या नागरिकांची तब्बल साडेतीन कोटींची रक्कम आहे. ही खाती पोलिसांनी गोठवली असून तपास सुरू केला आहे.

COMMENTS