Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मार्शल्सला बोलावूनही न आल्याने उपसभापती डॉ. गोर्‍हेंचा संताप

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, बुधवारी मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आमदारांची चांगलीच ख

पंजाबमध्ये दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या
पनवेल-स्वारगेट बसला अपघात, 20 प्रवासी जखमी
देशात यंदा एल निनोमुळे अपुरा पाऊस

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, बुधवारी मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आमदारांची चांगलीच खडाजंगी झाली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी-विरोधक थेट आमनेसामने आले. या मुद्द्याला घेऊन दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सभागृहाच्या मोगळ्या मैदानात येऊन दोन्ही गटाचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हा गोंधळ थांबवण्यासाठी विधापरिषदेत थेट मार्शल यांना बोलवण्याची वेळ आली. पण हे मार्शलच न आल्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे चांगल्याच संतापल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी सुरक्षा प्रमुखाची चांगलीच झाडाझडती घेतली आहे.
विधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधक यांच्यात गोंधळ वाढलेला असताना नीलम गोर्‍हे दोन्ही बाजूच्या आमदारांना शांत राहण्याचे आवाहन करत होत्या. परंतु त्यांचा आदेश झुगारून दोन्ही बाजूचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. आमदार सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत होते. ओबीसी आणि मराठा आरक्षणाची बैठक विधिमंडळात का घेतली नाही, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर ओबीसी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे सत्ताधार्‍यांकडून जोरदार गोंधळ घालण्यात आला. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात मार्शल्सन पाचारण केले. तसेच सभागृहातील सदस्यांना एकमेकांपासून एक फूट अंतर ठेवून उभे राहण्याचे निर्देश दिले. शेवटी हा गोंधळ थांबावा यासाठी नीलम गोर्‍हे यांनी थेट मार्शलला पाचारण केले. पण मार्शलला बोलवण्याचा आदेश देऊनही ते सभागृहात आलेच नाहीत. शेवटी गोर्‍हे यांना सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर मात्र कोर्‍हे यांना विधानपरिषदेचे सुरक्षा प्रमुख तसेच विधीमंडळ सचिव यांना तातडीने बोलावले. तसेच या अधिकार्‍यांची एक बैठक घेतली. या बैठकीत गोर्‍हे यांनी अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. तशी माहिती सूत्रांनी दिली.  विधानपरिषदेचे कामकाज सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा होती. पण काल (9 जुलै) पर पडलेल्या मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीवरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक झाले. या बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाही, म्हणून सत्ताधारी संतापले. तर ही बैठक विधिमंडळात का घेतली नाही? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न केला. याच गोंधळात पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. शेवटी गोंधळ चालूच राहिल्यामुळे नीलम रोर्‍हे यांना विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

COMMENTS