Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या तब्बल 109 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड

पाथर्डी /प्रतिनिधीः बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने यावर्षीही सुवर्ण यशाची परंपरा कायम राखत तब्बल 109 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल

बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राबवली स्वच्छता मोहीम
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड

पाथर्डी /प्रतिनिधीः बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने यावर्षीही सुवर्ण यशाची परंपरा कायम राखत तब्बल 109 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. महाराष्ट्र सरकारने यावर्षी पोलीस दलामध्ये विविध पदांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती. सदर भरती प्रक्रिया नुकतीच संपन्न होऊन त्यामध्ये बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे 109 विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले.      
  संपूर्ण महाराष्ट्रात इतक्या मोठ्या संख्येने पोलिस दलात भरती होण्याचा हा उच्चांक आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळून त्यांनाही नोकरीच्या संधी मिळाव्यात ही दुरदृष्टी ठेऊन मा.आमदार स्व.बाबुजी आव्हाड यांनी महाविद्यालयाची स्थापना केली. आज हे महाविद्यालय उसतोडणी कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाबरोबरच त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे गावपातळीवरील विद्यापीठ ठरत आहे. गत 10 वर्षात महाविद्यालयाच्या ग्रंथालय, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच भव्य अशा क्रीडांगणाचा व पुरविण्यात आलेल्या सोईसुविधांचा वापर करून 2154 विद्यार्थी शासकीय सेवेत भरती झाले आहेत. दिवसभर अभ्यासिकेत अभ्यास करून महाविद्यालयाने पुरविलेल्या प्रश्‍नसंचांचा सराव करून व क्रिडांगणावर शारीरिक चाचणीची तयारी करून विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून व प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्राबरोबरच ग्रंथालयात स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तकांची व मासिकांची उपलब्धता, तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना धावण्यासाठी 400 मी. ट्रॅक, इनडोअर स्टेडियम, गोळाफेक व उंच उडीसाठी स्वतंत्र मैदान आदि सुविधा निशुल्क पुरविण्यात आल्या. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची नवी उमेद मिळून ते चारपाच वर्षाच्या अथक प्रयत्नातून पोलीस दलात भरती झाले. याकामी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. किरण गुलदगड, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख, विद्यार्थी समुपदेशक डॉ. अभिमन्यू ढोरमारे, एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS