Homeताज्या बातम्यामनोरंजन

अरुंधतीची लेकीसोबत परदेशवारी

मुंबई प्रतिनिधी - सध्या सुट्ट्यांचा मौसम सुरू झाला आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे सर्वांचाच व्हेकेशन मूड ऑन झाला असून प्रत्येकजण कुठं कुठं

जेऊर आणि चिचोंडी पाटील कोविड केअर सेंटरसाठी १५ बेडस् कायमस्वरुपी भेट
पांजरपोळ येथील जागा उद्योग अधिग्रहणासाठी देण्यास मनसेचा कडाडून विरोध
भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीचा चीनला धसका

मुंबई प्रतिनिधी – सध्या सुट्ट्यांचा मौसम सुरू झाला आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे सर्वांचाच व्हेकेशन मूड ऑन झाला असून प्रत्येकजण कुठं कुठं फिरायला निघाले आहेत. काही जण गावाला गेले तर काही जण थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. तर काहींनी थेट परदेश गाठला आहे. आई कुठे काय करते मधील सर्वांची लाडकी अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर ही देखील आता सुट्टीवर निघाली आहे.मधुराणीनं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिच्या चाहत्यांना ती सुट्टीवर निघाली असल्याचं सांगितलं आहे.

आई कुठे काय करते मालिकेत मधुराणी प्रभुलकर ही अरुंधती ही भूमिका साकारत आहे. मधुराणी मुळची पुण्याची असून तिथंच तिचं संपूर्ण कुटुंब रहातं. मात्र मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं मधुराणी मुंबईत असते. महिन्यातले पंधरा दिवस मुंबईत काम करून ती दोन-तीन दिवसांसाठी पुण्यात जाते आणि पुन्हा मुंबईत परत येते. या सगळ्या धावपळीत तिला तिच्या लेकीसाठी म्हणजे स्वराली हिला फार वेळ देता येत नाही. परंतु जसं जमेल तसा ती वेळ तिच्या लेकीबरोबर घालवत असते. मधुराणीच्या लेकीला स्वराली हिच्या शाळेला सुट्टी लागली आहे. त्यामुळे मधुराणीनं चित्रकरणातून काही दिवस सुट्टी घेऊन लेकीबरोबर परदेशात गेली आहे. मधुराणीनं स्वरालीबरोबरचा विमानतळावरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वराली आणि मधुराणी खूपच आनंदात दिसत आहेत. दोघींचा सुट्ट्यांचा मोड ऑन झाला असून दोघीजणी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करत मधुराणीनं ‘ऑफ टू ऑस्ट्रेलिया’ असं लिहिलं आहे.

COMMENTS