Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरुण गवळीची तुरूंगातून होणार मुदतपूर्व सुटका

मुंबई ः देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच, कुख्यात गुंड अरूण गवळीची मुदतपूर्व सुटका होण्याची शक्यता आहे. कारण अरुण गवळीची शिक्षेतू

राजन पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, उमेश पाटलांचा जोरदार पलटवार
Vasai : वसईत पोलिसांची दादागिरी दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण | LokNews24
अहमदनगर जिल्ह्यात तरूणाची निर्घृण हत्या  

मुंबई ः देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच, कुख्यात गुंड अरूण गवळीची मुदतपूर्व सुटका होण्याची शक्यता आहे. कारण अरुण गवळीची शिक्षेतून सूट देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्य केली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर गवळीची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र, गृह विभाग यावर काय हरकत घेणार याकडे लक्ष असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉन अरुण गवळी याची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने दिले आहे. 2006 च्या एका शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने गवळीला मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासन आणि गृहविभागाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे.  मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात गुन्हेगारी कृत्य यासाठी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 2006 सालच्या राज्य सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे की, जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना 14 वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, त्याचबरोबर 65 पेक्षा जास्त वय असल्यावर तुरुंगात सोडता येईल. गवळीचा जन्म 1955 सालचा असल्याने त्याचे वय सध्या 70 वर्ष आहे.  नगरसेवक कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरणात गवळी 2007 पासून तुरंगात आहे. गवळी गेल्या सोळा वर्ष तुरुंगात आहे.

COMMENTS