Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर नगरीत पावसाचे आगमन पर्यटकांची मोठी गर्दी

नाशिक प्रतिनिधी - त्र्यंबकेश्वर नगरीत रविवारची सुट्टी ,पावसाचे आगमन, यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी आज झाली होती. दर्शन घेण्यासाठी जिथे राग

मित्र,मैत्रिणींचा गोतावळा अन तीस वर्षांनी पुन्हा भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा !
पहाटे पहाटे मला जाग आली…; काँग्रेस शहराध्यक्षांच्या गझलेला रसिकांची टाळ्यांची दाद
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रवरा स्कूलचे यश

नाशिक प्रतिनिधी – त्र्यंबकेश्वर नगरीत रविवारची सुट्टी ,पावसाचे आगमन, यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी आज झाली होती. दर्शन घेण्यासाठी जिथे राग दिसेल तेथे  यात्रेकरू पर्यटक जात होते. शिवनेरी धर्मशाळा परिसर त्रंबकेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी देणगी दर्शन पेड दर्शन रांग कोणती व तिकीट घेतल्यानंतर मंदिरात जायची रांग कोणती त्यात हा वाहतुकीचा रस्ता त्यामुळे यात्रेकरूंना लवकर उमजत नव्हते. मंदिर ट्रस्ट कडून सूचना दिल्या जात होत्या. धर्मदर्शन रांग आणि तिकीट दर्शन रांग बाबत सूचना दिल्या जात होत्या मार्गदर्शन केले जात होते. परंतु गोंधळाची स्थिती होती. या शिवाय पूर्व दरवाजा दर्शन बारी फुल झालेली होती.

COMMENTS