Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटक ; गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः घरासमोर अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्याला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. निसार शेख असे त्याचे नाव आहे

बांधकाम कामगारांनो एकीची वज्रमुठ बांधा ः डॉ. करणसिंह घुले
राजकीय सूड उगवण्यासाठी 30 कोटी केले शासनाला परत
मृतदेहाची नोंद न करता परस्पर अंत्यविधी करणार्‍यावर कारवाई व्हावी

अहमदनगर/प्रतिनिधी ः घरासमोर अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्याला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. निसार शेख असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 19 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नगर तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना रात्री सव्वा बारा वाजता घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून निसार शेख या तरुणाविरोधात अत्याचार, पोक्सो, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरूवातीला तिच्यासोबत अश्‍लील चाळे केले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. हा सर्व प्रकार फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी निसार शेख याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने फिर्यादीला जोरात ढकलून दिले. यामुळे फिर्यादीच्या हातातील बांगड्या फुटून त्या जखमी झाल्या आहेत. फिर्यादी यांनी सदरचा प्रकार दुपारी एमआयडीसी पोलिसांना कळविला. यासंदर्भात रात्री उशिरा गुन्हा दाखल करून निसार शेख याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहेत.

COMMENTS