Homeताज्या बातम्यादेश

आर्ची पोहोचली केदारनाथच्या दर्शनाला

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेली आहे.फिरण्यासाठी रिंकूनं थेट हिमालयात जायचं

टी – २० वर्ल्डकपसाठी पंचांची घोषणा… भारताचा एकमेव पंच…
सत्तेचा दुरुपयोग भाजप कसं करतो त्याचं दर्शन पुर्ण महाराष्ट्राने पाहिलं – नाना पटोले 
हॉटेलच्या वेटरने तडीपार गुंडाचा खून केला |

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेली आहे.फिरण्यासाठी रिंकूनं थेट हिमालयात जायचं ठरवलं आणि तिनं थेट केदारनाथाचं मंदिर गाठलं आहे.अभिनेत्री रिंकू राजगुरू केदारनाथ दर्शनसाठी गेली आहे. केदारनाथ मंदिराबाहेरचे फोटो तिनं शेअर केलेत.गौरीकुंड ते केदारनाथ असा 16 किलोमीटरचा ट्रेक करत रिंकू केदारनाथच्या मंदिराजवळ पोहोचली.कपाळावर चंदनाचा लेप त्यावर लाल टिका आणि अंगावर भगवी शाल परिधान केलेले केदारनाथ मंदिराबाहेरचे फोटो रिंकूनं शेअर केलेत.केदारनाथ ट्रिपमध्ये एन्जॉय करत असलेल्या रिंकूच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. “हरहर महादेव” असं म्हणत रिंकूने फोटो शेअर केलेत.

COMMENTS