Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संरेखनास मंजूरी

मुंबई : पुणे-नाशिक अंतर पाच तासांऐवजी केवळ दोन तासांत पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पु

साऊथ स्टार कीर्ती सुरेश लवकरच अडकणार लग्नबंधनात ?
उत्तम सोई-सुविधांसाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
कल्याण हल्ला प्रकरणावर फडणवीस आक्रमक !

मुंबई : पुणे-नाशिक अंतर पाच तासांऐवजी केवळ दोन तासांत पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संरेखनास अखेर अंतिम रुप देण्यात आले असून राज्य सरकारने यास मान्यता दिली आहे. आता औद्योगिक महामार्ग 180 किमीऐवजी 213 किमी लांबीचा असणार आहे. संरेखन अंतिम झाल्याने आता या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच भूसंपादन प्रक्रियेस सुरवात करण्यात येणार आहे.

COMMENTS