Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हाईस ऑफ मीडिया उर्दू विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी काझी मखदूम यांची नियुक्ती

बीड प्रतिनिधी - येथून प्रकाशित होणारे उर्दू दैनिक तामीर चे ज्येष्ठ संपादक काझी मखदूम यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या उर्दू विभाग मराठवाडा अध्यक्ष पदा

उत्तम सोई-सुविधांसाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे १ कोटींच्या खंडणीची मागणी
दिंडोरी – बालभारतीच्या भांडारातून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके प्राप्त

बीड प्रतिनिधी – येथून प्रकाशित होणारे उर्दू दैनिक तामीर चे ज्येष्ठ संपादक काझी मखदूम यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या उर्दू विभाग मराठवाडा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांची नियुक्ती उर्दू विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांनी केली. त्यांच्या नियुक्तीवर वृत्तपत्र क्षेत्रातून अभिनंदन होत असून शुभेच्छा दिल्या जात आहे.
व्हाईस ऑफ मीडिया संघटना संपूर्ण भारत देशात विस्तारलेली आहे. ज्याचे देशभरात 30 हजार पत्रकार पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. संपूर्ण देशभरातील 28 राज्यात संघटनेचे जाळे पसरलेले आहे. या संघटनेचे मराठी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संदीप काळे यांनी उर्दू भाषेच्या वृत्तपत्रांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाला पाहता व भारताच्या नवनिर्माणात उर्दू भाषेचे असलेले महत्त्व जाणून उर्दू भाषेतील वृत्तपत्रे व पत्रकारांना ही व्हॉइस ऑफ मीडिया सोबत जोडून घेत उर्दू विभागाला या संघटनेत खास स्थान दिले आहे. भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासात गेल्या वर्षीच म्हणजे सन 2022 मध्ये उर्दू पत्रकारितेने 200 वर्ष पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे सन 1822 मध्ये कोलकता येथून जाम ए जहानुमा हे पहिले उर्दू वृत्तपत्र प्रकाशित करण्यात आले होते. ज्याचे मालक व संपादक सदा सुखलाल होते. आज सुद्धा दिल्ली येथून प्रताप आणि हिंद समाचार नामक उर्दू दैनिक भारतातील शंभर नामवंत उर्दू दैनिकांत आहेत. या वृत्तपत्रांचे मालक व संपादक हिंदू आहेत. आजही देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त प्रकाशित होणारे उर्दू दैनिक आहेत. जे देश विदेशात वाचले जातात. महाराष्ट्रात सर्वात जास्त उर्दू भाषा बोलली व वाचली जाते. एकट्या मराठवाडा विभागात पंधरा उर्दू दैनिक प्रकाशित होतात. मराठवाडा विभागातून दरवर्षी उर्दू माध्यमातील एक लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. मराठवाड्यातील प्रत्येक मोठ्या शहरात 25% उर्दूवाचक वर्ग आहे. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक च्या 250 शाळा सेवार्थ आहेत आणि हेच उर्दू भाषेच्या प्रसाराचे मोठे माध्यम आहे. अशा या उर्दू भाषेचे बीड येथून प्रकाशित होणारे दैनिक तामीर चे संपादक काझी मखदूम यांनी मुंबईहून राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणारे दैनिक इन्कलाब आणि जनसत्ता हिंदी चे प्रतिनिधित्व केलेले आहे. आतापर्यंत केलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाला पाहून त्यांना आतापर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

COMMENTS