मुंबई: आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या युवक-युवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. य
मुंबई: आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या युवक-युवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवकांना मानव संसाधन विकासाचा प्रमुख स्रोत मानले जात असून विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या अनुषंगाने राज्याच्या युवा धोरण 2012 नुसार राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवक, युवती व संस्थांनी 2019-20 ते 2024-25 या कालावधीसाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी 19 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे. पुरस्कारासाठीचे अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, दुसरा मजला, जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर कार्यालय, धारावी येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS