ते कुठे बेपत्ता होते याचे उत्तर द्यावे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ते कुठे बेपत्ता होते याचे उत्तर द्यावे

अनेक महिने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीच कारभार चालवला ते कुठे बेपत्ता होते याचे उत्तर द्यावे,गुलाबराव पाटील यांचे डॉ राजेंद्र शिंगणे यांना प्रतिउत्तर

बुलढाणा प्रतिनिधी - राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक महिने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीच कारभार चालवला,  एकाही जिल्ह्याला पाल

गुलाबराव पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत नृत्याचा लुटला आनंद.
“खापर पणजा येऊ दे खाली आडवा केल्याशिवाय राहणार नाही”
दिव्यांग उपक्रमांच्या अनुदानबाबतचे धोरण मंजूर

बुलढाणा प्रतिनिधी – राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक महिने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीच कारभार चालवला,  एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते, त्यामुळे विविध जिल्ह्यातील कामे पूर्णपणे ठप्प झाली होती, त्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री शोधुन द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुलडाणा पोलीस ठाण्यात केली होती. त्यावर आज पालकमंत्री गुलाबराव पाटील बुलडाणा जिल्हा दौर्‍यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक  पार पडली. यावेळी त्यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना प्रत्युत्तर केले आहे ते म्हणाले की, मी बेपत्ता राहण्याचे कारणच नाही माझा जिल्ह्यात तिसरा दौरा आहे. अहो एका महिन्यात तीन वेळेस येणारा पालकमंत्री शिंगणे साहेबांनी सहा महिने बैठक घेतली नाही पण ते कुठे बेपत्ता होते याचे उत्तर त्यांनी पहिले द्यावे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

COMMENTS