Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितची आरक्षण बचाव यात्रेची घोषणा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध ः अ‍ॅड. आंबेडकर

छ. संभाजीनगर ः राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्‍नांवरून वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. आरक्षणाच्या मुद्दयांवरून ओबीसी विरूद्ध मराठा समाज अ

आता मैदानात उतरलोय काय होईल ते बघून घेऊ – चंद्रकांत खैरे
‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.
आमच्यासोबत आले म्हणून बरं झालं… नाहीतर काँग्रेसची अवस्था आणखी वाईट झाली असती

छ. संभाजीनगर ः राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्‍नांवरून वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. आरक्षणाच्या मुद्दयांवरून ओबीसी विरूद्ध मराठा समाज असा संघर्ष उभा केला जात आहे. याविरोधात मंत्री छगन भुजबळांनी खासदार शरद पवारांची भेट घेत राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येणार असल्याचे दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत वंचितची आरक्षणाची भूमिका जाहीर केली. यावेळी बोलतांना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीकडून 25 जुलैपासून वंचित व विविध ओबीसी संघटनांच्या वतीने राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात शांतता नांदावी व ओबीसींचे आरक्षण कायम रहावे, ही प्रमुख मागणी या यात्रेची असणार आहे. राज्यात सध्या जरांगे पाटील यांची मागणी जोर धरून आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही त्यांची भूमिका आम्हाला न पटणारी आहे. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एक सर्वपक्षीय बैठक देखील पार पडली. त्यावेळी सर्व पक्षांनी आपली लेखी भूमिका सरकारकडे द्यावी, असे ठरले होते. परंतु, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येक पक्षाला पत्र दिले जाणार होते, तशा आशयाचे पत्र अद्याप वंचित बहुजन आघाडीला मिळालेले नाही. सर्व राजकीय पक्षांना पत्र गेले की नाही, याबाबत मला माहित नाही. पण आम्हाला जेव्हा पत्र येईल, तेव्हा आम्ही वंचितची भूमिका मांडणार आहोत. आम्हाला वाटते की, राज्यातील जी स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती शांत झाली पाहिजे. राज्यात सर्वत्र शांतता नांदावी. दुसरे म्हणजे सर्व समाजाचे आरक्षण वाचले पाहिजे, एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ झाली पाहिजे, गेल्या कित्येक वर्षांपासून त्यात ना केंद्र सरकार ना राज्यसरकार वाढ करते. तसेच ओबीसींच्या मुलांना जी शिष्यवृत्ती मिळते, त्यात देखील भरघोस वाढ होणे तितकेच गरजेचे आहे.

25 जुलैपासून होणार यात्रेला प्रारंभ – चैत्यभूमी ते राजर्षी शाहू महाराज यांची समाधीपर्यंत आरक्षण बचाव यात्रा काढली जाणार आहे. 25 जुलैपासून या यात्रेला प्रारंभ होईल, नागपूर, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, जालना, संभाजीनगर मार्गे ही यात्रा राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर या यात्रेचा समारोप होणार आहे. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, ही यात्रा काढण्याची मुख्य भूमिका आम्ही अगदी स्पष्ट केलेली आहे.

COMMENTS