Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितकडून विधानसभेसाठी 11 उमेदवारांची घोषणा

तृतीयपंथीय उमेदवाराला दिले उमेदवारी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच आणि महाविकास आणि महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असतांनाच वंचित बहुजन आघाडीने जागा वा

तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, ०३ जून २०२२ | LOKNews24
स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’
खा. शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच आणि महाविकास आणि महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असतांनाच वंचित बहुजन आघाडीने जागा वाटपात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीने शनिवारी आपल्या 11 उमेदवारांची नावे जाहीर केली असून, यामध्ये तृतीयपंथीय उमेदवाराला उमेदवारी दिली आहे.
राज्यात तिसर्‍या आघाडीची चाचपणी सुरू असतांना आणि त्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना घेण्याची चर्चा सुरू असतांना आंबेडकर यांनी स्वत:च्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळं कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, ती कधी होईल याबाबत अनिश्‍चितता आहे. असे असले तरी प्रमुख पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. काही फॉर्मुले समोरही येत आहेत. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ती झाल्यानंतर कोण-कोणत्या जागा लढवणार हे ठरणार आहे. हे सगळे गुर्‍हाळ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात प्रामुख्यानं विदर्भ व मराठवाड्यातील मतदारसंघांचा समावेश असून विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. यादी जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या नावांपुढे त्यांच्या समाजाचा उल्लेख करण्यात आला आहे. एका तृतीयपंथीयालाही स्थान देण्यात आले आहे.

वंचितचे 11 उमेदवार – रावेरमधून शमिभा पाटील, सिंदखेड राजा सविता मुंढे, वाशिम-मेघा किरण डोंगरे, धामणगाव रेल्वे-नीलेश विश्‍वकर्मा, नागपूर दक्षिण पश्‍चिम-विनय भांगे, साकोली-डॉ. अविनाश न्हाणे, नांदेड दक्षिण-फारुख अहमद, लोहा-शिवा नारांगळे, औरंगाबाद पूर्व-विकास रावसाहेब दांडगे, शेवगाव – किसन चव्हाण, खानापूर-संग्राम कृष्णा माने यांच्या नावांचा समावेश आहे.

शमिभा राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार – रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शमिभा महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. शमिभा पाटील या तृतीयपंथी असून सामाजिक कार्यकर्त्या आहेत. शमिभा यांचे पूर्वीचे नाव श्याम मीना भानुदास पाटील असे होते. त्यांनी नंतर शमिभा नाव धारण केले. त्यांनी वयाच्या 30 व्या आपण तृतीयपंथी असल्याचे सार्वजनिक केले आहेते. शमिभा या उच्च शिक्षित असून त्यांनी मराठी विषयात एम.ए केले आहे. सध्या त्या कवी ग्रेस यांच्या साहित्याचा पूर्वभ्यास यावर पी.एचडी करत आहे.

COMMENTS