अनिल देशमुखांना चांदिवाल आयोगाकडून 50 हजारांचा दंड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल देशमुखांना चांदिवाल आयोगाकडून 50 हजारांचा दंड

मुंबई : चांदिवाल आयोगाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. आयोगापुढे मंगळवारी झालेल्या सुनावणीला देशमुखांचे वकिल

उत्तरप्रदेशात दुसर्‍या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा | DAINIK LOKMNTHAN
मोदींनी प्रस्ताव नसताना गुजरातला मदत ; अजित पवार यांची टीका
पाचगणीच्या भुरळ घालणार्‍या नैसर्गिक सौंदर्यात सेल्फी पॉइंटची भर; पर्यटकांची तुफान गर्दी

मुंबई : चांदिवाल आयोगाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. आयोगापुढे मंगळवारी झालेल्या सुनावणीला देशमुखांचे वकिल अनुपस्थित राहिल्यामुळे वेळ वाया घालवल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला.आयोगापुढे मंगळवारी झालेल्या सुनावणीत सचिन वाझेची उलटतपासणी होणार होती. ज्यासाठी अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांनाही जेल प्रशासनाने आयोगापुढे हजर केले. मात्र वाझेची उलटतपासणी घेण्यासाठी अनिल देशमुखांचे वकील अनुपस्थित होते. त्यामुळे आयोगाचे मंगळवारचे कामकाज होऊ शकलें नाही. आयोगाचा वेळ खर्ची पडल्याबद्दल अनिल देशमुखांना 50 हजारांचा दंड आकारण्यात आला. देशमुखांना ही मदत मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेत. अनिल देशमुखांना चांदिवाल आयोगाने दंड आकारण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही त्यांच्या वकिलांनी आयोगाकडे वेळ मागितल्याने देशमुखांना 15 हजारांचा दंड लावण्यात आला होता.

COMMENTS