Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांचा 20 फेबु्रवारीपासून बेमुदत संप

अकोले/प्रतिनिधी ः अंगणवाडी सेविका आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आक्रमक झाल्या असून, त्यांनी संपूर्ण राज्यात येत्या 20 फेबु्रवारीपासून बेमुदत संपाचा

राहाता शहरात महात्मा फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात  
प्रबोधनाशिवाय क्रांती होणे अशक्य ः अ‍ॅड. दिलीप काकडे
नगर शहराचा प्रगतीचा व विकासाचा वेग कमी : माजी आमदार कळमकर

अकोले/प्रतिनिधी ः अंगणवाडी सेविका आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आक्रमक झाल्या असून, त्यांनी संपूर्ण राज्यात येत्या 20 फेबु्रवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. अंगणवाडी कर्मचारी ताईंच्या मागण्यांसाठी आपल्या एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग, अकोले व राजुर प्रकल्पांतर्गर असलेल्या अंगणवाडी कर्मचारी ताईं संपूर्ण राज्यात 20 फेबु्रवारीपासुन सुरु होणार्‍या बेमुदत संपात सहभागी होणार असून त्या अनुषंगाने सोमवारी अकोले येथे राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित मागण्यांसाठी व काही स्थानिक मागण्यांसाठी मोर्चा नेत निदर्शने करण्यात आले. सदर मोर्चासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईं आज अंगणवाडी केंद्र पूर्ण बंद ठेऊन या दिवशी मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यामध्ये म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचार्‍यांना 15 हजार  मानधनवाढ तातडीने लागू करा, ग्रॅज्युइटी व पोषण ट्रॅकर ऍप बाबद सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाचे पालन करून अंगणवाडी कर्मचारी ताईंना त्याचा लाभ व्हावा यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करा, सर्वांना नवीन मोबाईल व मोबाईल मध्ये  मराठी ऍप तसेच मोबाईल देखभाल खर्च तातडीने द्या, सर्व अंगणवाडी कर्मचारी ताईंसाठी मासिक पेन्शन द्या,  सर्व सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रलंबित निवृत्ती मानधन-पेन्शन तातडीने अदा करा, मिनी अंगणवाडी ताईना कोणत्याही अटी व शर्ती शिवाय पुर्ण अंगणवाडीचा दर्जा लागू करा, मदतनिसांना सेविका पदी बढती बाबत निकष सोपे सरल करा, मदतनीस ताईंना सेविकेच्या तुलनेत 75% पगार लागु करा, अकोले येथे झालेल्या मुक्काम मोर्चा आंदोलनात आपल्यावतीने देण्यात आलेल्या आश्‍वासना प्रमाणे योग्यती कार्यवाही करून संघटनेची बैठक घेण्याबाबद पाल्यावतीने टाळाटाळ व विलंब होत आहे, त्या बाबद तातडीने उपाययोजना करा, आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी लढणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना प्रकल्प कार्यालयाकडून व्यक्तिगत दोषी मानून अपमान जनक वागणुन आपल्या कार्यकाळात होत असुन आंदोलक अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना सन्मानाची वागणूक घ्या, संपूर्ण देशात भ्रष्ट शासनाने दिलेल्या सदोष मोबाईल मुळे व इंग्रजी अँप मुळे मोठे आंदोलन व कायदेशीर कार्यवाही सुरु आहे, तरीही आपल्या कार्यालयाकडून व्यक्तिगत- खाजगी मोबाईल वरून काम करण्याची अन्यायकारक सक्ती केली जात असल्याने सदर अनुचित प्रकरण तातडीने थांबवा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. वरील सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत 20 फेबु्रवारी पासून राज्यभर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती’’ यांच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संप कामबंद आंदोलनात आम्ही एकजुटीने सहभागी होत, असल्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटना अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव संघटक व सदस्या यांनी दिला आहे.

COMMENTS