बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना.

बापाकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

वर्धा प्रतिनिधी/  बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नराधम बाप १७ वर्षीय पोटच्या मुलीवर सलग तीन वर्

बीडमध्ये अतिरिक्त उसाचा पहिला बळी
ममता बॅनर्जींच्या भाच्याला ईडीचे समन्स
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत

वर्धा प्रतिनिधी/  बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नराधम बाप १७ वर्षीय पोटच्या मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली आहे. पीडित मुलगी ही बारावीत शिकत आहे. अखेर पीडितेने याबाबतची माहिती तिच्या शाळेतील शिक्षिकेला सांगितली. शिक्षिकेने घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ जिल्हा बाल संरक्षण समिती व चाईल्ड लाईन केंद्राला याबाबत कळवले. चाईल्ड लाईनचे थेट अल्लीपूर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी  तत्काळ याप्रकरणात पीडितेच्या बयाणावरुन नराधम बापाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केलीय. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल गाडे करीत आहेत.

COMMENTS