अमृतसर/वृत्तसंस्था ः पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज रोडवर सोमवारी सकाळी सहा वाजता पुन्हा स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सकाळ
अमृतसर/वृत्तसंस्था ः पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज रोडवर सोमवारी सकाळी सहा वाजता पुन्हा स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सकाळी सहा वाजता स्फोट झाल्याने याठिकाणी वर्दळ नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र गेल्या 24 तासांमध्ये हा दुसरा स्फोट असल्यामुळे पंजाबमध्ये पोलिस प्रशासन यंत्रणा सजग झाली आहे. पहिल्यांदा झालेल्या स्फोटाचे कारण शोधण्यात पोलिस गुंतले असतांना आणखी दुसरा स्फोट झाल्याने अमृतसर हादरले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सकाळी स्फोटाची माहिती मिळताच पोलिस आयुक्त नौनिहाल सिंग स्वतः घटनास्थळी पोहोचले. त्याच्यासोबत डिटेक्टिव्ह डीसीपी आणि एसीपी गुरिंदरपाल सिंग नागरा हे देखील उपस्थित होते. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ आणखी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. 24 तासांतील ही दुसरी घटना आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि एफएसएल पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शनिवारी रात्री देखील या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. आता पुन्हा सोमवारीही येथून जवळच आणखी एक स्फोट झाला आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता हा स्फोट झाला. पोलिस आणि सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनेनंतर अमृतसर पोलिसांचे बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने आजूबाजूचा परिसर शोधला जात आहे. सीवरेज लाइन आणि गटर्सचीही तपासणी केली जात आहे.
यापूर्वी शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हेरिटेज स्ट्रीटवर स्फोट झाला होता. या स्फोटामुळे सारागढी पार्किंगमधील खिडक्यांच्या काचा फुटल्याने 5 ते 6 भाविक जखमी झाले. डीसीपी परमिंदर सिंह भंडल यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमला घटनास्थळावरून 3-4 संशयास्पद तुकडे सापडले आहेत. जे तपासासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी याआधी जवळच्या रेस्टॉरंटमधील चिमणीचा स्फोट हा अपघाताचे कारण असल्याचे सांगितले होते, मात्र सकाळी तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांचे तथ्य पालटले. डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था परमिंदर सिंग भंडाल यांनी सांगितले की, चिमणी स्फोटामुळे ही घटना घडली नाही. काही संशयास्पद वस्तू सापडल्या, ज्या फॉरेन्सिक विभागाच्या पथकांनी ताब्यात घेतल्या आहेत.
COMMENTS