अमरावती प्रतिनिधी - भारतीय डाक विभागामार्फत आयोजित देशव्यापी विशेष सुकन्या अभियानातंर्गत अमरावती डाक विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला
अमरावती प्रतिनिधी – भारतीय डाक विभागामार्फत आयोजित देशव्यापी विशेष सुकन्या अभियानातंर्गत अमरावती डाक विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिवसा तालुक्यातील मोझरी गाव संपूर्ण सुकन्या ग्राम घोषित करण्यात आलं आहे. या गावातील सर्व मुलींचे सुकन्या खाते उघडण्यात आले आहे. सुकन्या अभियान ९ आणि १० फेब्रुवारी दरम्यान डाक विभागाकडून देशभर राबविण्यात आले. या दरम्यान अमरावती डाक विभागाने तब्बल ९ हजार ८२७ सुकन्या समृध्दी खाती उघडण्यात आली आहे. अमरावती डाक विभागाने राज्यासह देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.जिल्ह्याचा देशपातळीवर चौथा क्रमांक आलाय. डाक विभागाकडून हा उपक्रम ८ मार्च महिला दिनापर्यंत राबविण्यात येणार आहे. ० ते १० वर्ष वयोगटातील मुलींचे सुकन्या समृद्धी चे खाते उघडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. माझ्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व गावे सुकन्या शहर करण्याचा प्रयत्न डाग विभागाचा आहे यासाठी जिल्ह्यातील नागरिक तसेच अंगणवाडी सेविकांनी सहाय्य करण्याचे आवाहन डाक विभागाने केले आहे.
COMMENTS