Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मल्लिकार्जुन मंदिरात शिवभक्तांचा आमरस अभिषेक

इस्लामपूर / प्रतिनिधी : क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान सेवाभावी मंडळाच्या वतीने क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान डोंगरावरती प्रचंड शिवभक्तांच्या उप

कराड-पाटण मार्गावर ओमनी-दुचाकी धडकेत तिघे गंभीर
Aurangabad : वाढलेल्या महागाईवर भाजपाने जनतेचेआशीर्वाद मागायला पाहिजे – आ. आंबादास दानवे l Lok News24
कुडाळच्या कुंभार समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे स्वागत

इस्लामपूर / प्रतिनिधी : क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान सेवाभावी मंडळाच्या वतीने क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान डोंगरावरती प्रचंड शिवभक्तांच्या उपस्थितीत आमरस अभिषेक सोहळा पार पडला. सालाबादप्रमाणे याहीवर्षी आमरस अभिषेक सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी 27 डझन आंबे, पंधरा किलो साखर, दहा लिटर दूध, वापरण्यात आले. आमरस अभिषेक झाल्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी कुरळप स्टेशनचे पोलीस बाजीराव भोसले, किरण कुलकर्णी, देवेंद्र पाटील, प्रवीण पाटील, योगेश सूर्यवंशी, संभाजी पाटील, प्रतीक पाटील, शुभम शेवाळे, प्रवीण पाटील परबत, गुंडा थोरात, विकास चैगुले, अभिजीत मदने, विशाल शिंदे, विजय पाटील, जयदिप पाटील, भरत शेवाळे, कृष्णा पाटील, गणेश लोहार, योगेश गुरव, प्रमोद स्वामी, प्रसाद स्वामी व इतर सर्व शिवभक्त बंधू भगिनींच्या उपस्थितीत प्रचंड मोठ्या संख्येने आमरस अभिषेक करण्यात आला. यंदा आमरस अभिषेकसाठी प्रचंड गर्दी जमल्यामुळे इथून पुढेही मल्लिकार्जुन देवस्थानचे सर्व कार्यक्रम अशाच उत्साहात साजरे करण्याचे ठरले आहे. सर्व भाविकांचे मल्लिकार्जुन देवस्थान सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांनी आभार मानले.

COMMENTS