Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडताना अमोल कोल्हेंचं सूचक भाष्य

मी शेतकऱ्याचा पोरगा आहे उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही

पुणे प्रतिनिधी - मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं

संसदरत्न खा.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ॲड.प्रतापराव ढाकणे सुरु केलेल्या युवा संवाद अभियानाचा सोमवारी युवा संवाद अभियानाचा समारोप
शिरुरमधून डॉ. कोल्हेच लढणार लोकसभा
अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी द्या – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे प्रतिनिधी – मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं आणि मग वावर नांगरायला घ्यायचं असतं. अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सूचक वक्तव्य केलं. निवडणूक अजून खूप लांब आहे, आताच पक्षांतर आणि नाराजी या गोष्टींच्या चर्चा करण्यात काहीही तथ्य नाही. अकारण बुद्धीभेद करण्याचा हा प्रयत्न विकासाच्या वाटेपासून दूर नेणारा आहे, असंही कोल्हे म्हणाले. पक्षांतर-नाराजीच्या चर्चांवर मौन सोडताना, मला त्यात रस नसल्याचं कोल्हेंनी स्पष्ट सांगितलं आहे.

COMMENTS