Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरातील नावलौकिक असलेल्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी अमोल गर्जे यांची बिनविरोध निवड

पाथर्डी प्रतिनिधी - शहरातील लालकृष्ण नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अमोल गर्जे यांची तर व्हाईस चेअरमन पदी अशोक मंत्री यांची बिनविरोध निवड झाली. या

डिजिटल युगात पारंपारिक पत्रकारितेत मोठा बदल : संतोष धायबर
बोगस प्रमाणपत्र मिळवणार्‍यांवर गुन्हे दाखल करा
विधानसभेपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकावे

पाथर्डी प्रतिनिधी – शहरातील लालकृष्ण नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अमोल गर्जे यांची तर व्हाईस चेअरमन पदी अशोक मंत्री यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी बोलताना अमोल गर्जे यांनी म्हटले की,या संस्थेला ३२ वर्षांची परंपरा असून यापुढील काळात सर्वांना विश्वासात घेत पतसंस्थेला प्रगतिपथावर नेण्याचे काम केले जाईल.आजपर्यंत सर्व सभासदाचा विश्वास जोपासण्याचे काम या पतसंस्थेने करत स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध केली आहे.आज अनेक पतसंस्थेवर सभासद आणि नागरिकाचा विश्वास नाही.या संस्थेची तालुक्यात नावलौकिक करण्यासाठी माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आहेत.येणाऱ्या काळात या पतसंस्थेच्या प्रतिष्ठेला कुठलाही  दाग लागणार नाही अशी ग्वाही देतो असे प्रतिपादन अमोल गर्जे यांनी केले.

यावेळी संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अशोक गर्जे यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच मित्र परिवार उपस्थित होते.

COMMENTS