Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमिताभ बच्चन यांना ’भारतरत्न’ पुरस्कार मिळावा; ममता बॅनर्जी यांची मागणी

मुंबई ः हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. अमिताभ यांनी चार द

एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या | LOKNews24
राहाता नगरपरिषद मुंबई दुर्घटनेतून धडा घेणार का ?
स्वायत्त महाविद्यालयांसाठी विद्यापीठाकडून मार्गदर्शक सूचना

मुंबई ः हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत अनेक चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा अभिनयामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग हा प्रत्येक वयोगटातला आहे. आणि याच कारणामुळे आता महानायक अमिताभ बच्चन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.


पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. नुकतंच कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरवात झाली. यावेळी त्या म्हणाल्या होत्या. त्या असं म्हणाल्या की, अधिकृरित्या नसले तरी आम्ही बंगालमधून अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ दिलेल्या योगदानाबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी करणार आहोत’. दरम्यान, या महोत्सवात अभिनेता शाहरुख खान आणि शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अर्जित सिंग, जया बच्चन, अमिताभ बच्चन आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपट महोत्सवाची सांगता 22 डिसेंबर रोजी होणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

COMMENTS