Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड शहरातील इमामपुर रोडलगतचे अतिक्रमण नगर परिषदेने न काढल्याने स्वातंत्र्यदिनी अमरण उपोषण -सुनील महाकुंडे

दत्तात्रेय कवितके उपजिल्हाधिकारी पुणे

बीड प्रतिनिधी - बीड शहरात न.प. हद्दी मध्ये बांधकाम मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यातील बरेच बांधकाम हें अनधिकृत असून त्याकडे न.प.मुख्यधिकारिया

बैलांनी एकत्र महिलेला शिंगांनी उडवून पायाखाली तुडवलं.
हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावा
इस्लामपूर भाजपा युवा मोर्चाचे अभिजीत खडके यांचे अपघाती निधन

बीड प्रतिनिधी – बीड शहरात न.प. हद्दी मध्ये बांधकाम मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यातील बरेच बांधकाम हें अनधिकृत असून त्याकडे न.प.मुख्यधिकारियाचेदुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सुरु असलेले बांधकाम करणार्याकडे परवाना देखील घेतला जात नसून मुख्याधिकारी यांनच्या दुर्लक्षने शहारत एकही कारवाई न झाल्याने बिनधास्त मनमानी सुरु आहे. बीड शहरातील बार्शी नाका, ईमामपूर रस्त्यावर, राहुल नगर लगत एकाने अतिक्रमण करून रस्त्यावर आर.सी.सी. दुकान बांधकाम केले असून अतिक्रमण धारकांच्या विरोधात नगर परिषद बीडने आजपर्यंत काहीच कारवाई न केल्यामुळे स्वातंत्र्यदिनी अमरण उपोषणाला बसण्याचा ा इशारा माजी सभापती न.प.सुनील महाकुंडे यांनी जिल्हाधिकार्यांना दिला आहे.
वरील विषयी अर्ज सादर केला आहे की, उमेश भारत ढोले. या व्यक्तीने 90 वर्षा पासुनच्या रस्त्यावर आर. सी. सी. बांधकाम केलेले आहे. सदर बांधकाम केलेल्या नालीचे चेंबर खाली सिमेंटचा रस्ता आहे व बाजुच्या राहणान्या नंदाबाई मुळे यांच्या समोरील घराचा रस्ता 10 फुट रजिस्ट्री खरेदीखतामध्ये दिलेला आहे. त्यावर सुद्धा तेथुन सदर रस्त्यावरून तेथील नागरीकांना जाता येत नाही. सदरील दुकान हे पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर बांधले आहे. सदरील जागेचा बांधकाम कार्यालय नगर परिषद, बीड. परवानगी-ले आऊट, पो. आर. कार्ड, 7/12 इत्यादी तपासून त्या रस्त्यावर बांधकाम केलेल्या व्यक्तीवर कार्यवाही करून सदर बांधकाम पाडून हा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात यावा असे न झाल्यास आम्ही रहिवाशी व खालील सहया करणारे नागरीकन.प. समोर आंदोलन करणार आहोत. तसेच सदरील रस्ता खुला करून दिला नाही तर, दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहोत, ज्याच्या होणान्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही न.प. कार्यलय व मुख्यधिकारी तसेच त्यास नगर परिषद व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी. या अगोदर मा. मुख्याधिकारी नगर परिषद, बीड यांना तक्रारी अर्ज देवून सुध्दा कसल्याही प्रकारची कार्यवाही अद्यापपर्यंत झाली नसल्यामुळे नगर परिषद बीडच्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी अनाधिकृत बांधकाम धारकांना सतत पाठीशी घालत असून मा.जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई न केल्याबद्दल स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या भागातील नागरीकांसह उपोषणास बसणार असल्याचे सुनील महाकुंडे यांनी सांगीतले.

COMMENTS