Homeताज्या बातम्यादेश

देवेगौडा यांच्या नातवावर लैंगिक शोषणाचे आरोप

बंगळुरू ः कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरांनी चांगलीच गाज असतांना रविवारी कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघत्तचे

“दे धक्का2” मध्ये अवतरली मस्तानी, गौरीचा लूक मस्तानी व्हायरल.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी 
भाजपने केला शिवसेनेच्या 18 जागांवर दावा

बंगळुरू ः कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरांनी चांगलीच गाज असतांना रविवारी कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघत्तचे खासदार आणि जेडीएसची उमेदवार आणि माती पंतप्रधान एचडी देवगौडा यांचे नातू  प्रज्वल रेवन्ना यांच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात येत आहे. याची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे रेवन्ना यांच्या समोरील अडचणी वाढतांना दिसून येत आहे.
कर्नाटक राज्य महिला आयोगाने 26 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष टीम तयार करण्याची मागणी केली होती. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या दोनच दिवस आधी सोशल मीडियावर अश्‍लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सरकारने प्रज्वल रेवन्ना अश्‍लील व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात एक विशेष तपास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हसन जिल्ह्यात अश्‍लील व्हिडिओ क्लिप प्रसारित केल्या जात आहेत, जिथे महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे दिसून येते, मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर लिहिले. जेडीएस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे निवडणूक एजंट पूर्णचंद्र तेजस्वी एमजी यांनी या अश्‍लील व्हिडिओ-फोटोप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवीन गौडा आणि इतर अनेकांनी प्रज्वल रेवण्णाची बदनामी करण्यासाठी हे अश्‍लील व्हिडिओ शेअर केल्याचे त्याने म्हटले आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, नवीन गौडा आणि इतरांनी प्रज्ज्वल रेवन्ना यांची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ आणि चित्रे तयार केली आणि हसन लोकसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये ते शेअर केले आहे.

COMMENTS