आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला पाहिजे : पंतप्रधान मोदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला पाहिजे : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकाईन यासारख्या आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र येऊन धोरण ठरविण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यां

एमपीएससीच्या परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल
नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई
इस्त्रोच्या चांद्रयान-3 ची तयारी अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकाईन यासारख्या आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र येऊन धोरण ठरविण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आभासी चलन चुकीच्या हातात जाऊन युवकांचे जीवन बरबाद होऊ देता कामा नये, असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. ‘दि ऑस्ट्रेलिअन स्ट्रेटिजीक पॉलिसी इन्स्टिट्युट’ आयोजित सिडनी डायलॉग या तीन दिवसीय शिखर परिषदेला संबोधित करतांना ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच आभासी चलनाबद्दल आपली भूमिका मांडली. भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल, सुरु असलेल्या बदलांबाबत तसंच सायबर तंत्रज्ञाशी संबंधित आव्हानांबाबत मोदी यांनी भाष्य केले. क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन या आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला पाहिजे, परस्पर सहकार्य केले पाहिजे, या गोष्टींचा गैरवापर होणार नाही, या आभासी चलनामुळे युवा पिढी बिघडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. डिजिटल क्रांतीमुळे आपण एक मोठे स्थित्यंतर अनुभवत आहोत. यामुळे राजकारण, अर्थव्यवस्था, समाज याची पुर्नमांडणी होत आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे सार्वभौमत्व, शासन, नैतिकता, कायदा, हक्क, सुरक्षा यावर नवीन प्रश्‍न निर्माण झाले आहेत असे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. भारतातील डिजिटल क्रांतीचा आणि त्यामुळे होत असलेल्या 5 प्रमुख बदलांचा उल्लेख मोदी यांनी यावेळी केला. देशात आम्ही 6 लाख गावे ही फायबर केबलने जोडत आहोत. आरोग्य सेतू आणि कोविन अँप यांचा वापर करत आम्ही 110 कोटींपेक्षा जास्त लोकांना लस दिली. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा शासन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात करत आहोत. आरोग्यापासून राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत तसे उद्योग आणि सेवा क्षेत्रात आमुलाग्र बदल हे डिजिटल क्रांतीमुळे होत आहेत, केले जात आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता, भविष्यातील दूरसंचार क्षेत्र जसं की 5 जी आणि 6 जी या सर्वांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याची माहिती मोदी यांनी त्यांच्या भाषणात दिली.

भारताकडे असेल स्वत:ची क्रिप्टोकरन्सी
गेल्या पतधोरणाचा आढावा घेतांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी क्रिप्टोकरन्सी बदद्ल भाष्य करत, पुढील योजनांचे संकेत दिले होते. रिझर्व्ह बँक पुढील वर्षी आपली स्वत:ची डिजिटल करन्सी लॉन्च करण्याची शक्यता आहे. त्यासाठी एक योजना आखण्यात आली असून, त्यावर सातत्याने काम सुरू आहे. भारतीय स्टेट बँकेच्या बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने याबाबत पूर्ण शक्यता असल्याचे सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट आणि सेटलमेंट विभागाचे मुख्य व्यवस्थापक पी. वासुदेवन यांनी सांगितल्यानुसार, पुढच्या वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल करन्सी आणली जाईल. रिझर्व्ह बँक पुढच्या वर्षी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी लॉन्च करण्याची शक्यता आहे. ही डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी असेल. मात्र ही करन्सी भारताचे मूळ चलन असलेल्या रुपयाचे डिजिटल रूप असेल. म्हणजेच ती डिजिटल रुपया असेल.

COMMENTS