Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार अन्यथा फडणवीस होणार मुख्यमंत्री

राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी धरला जोर

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या 16 आमदारांवर पदाची टांगती तलवार अस

अर्थखाते टिकेल की नाही सांगता येत नाही
अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – महेश तपासे 
वय झाले, आतातरी थांबणार की नाही ?

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या 16 आमदारांवर पदाची टांगती तलवार असून, त्यात एकनाथ शिंदेंचा देखील समावेश असल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असून, त्यामुळे अजित पवारांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना जर बडतर्फ केल्यास देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री होवू शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे, मात्र यासंदर्भातील चित्र 10 ऑगस्टपूर्वी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय नेतेमंडळींनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. पण न भूतो, न भविष्यती अशा शपथविधीसोहळ्यानंतर मात्र अजित पवारांनी उचललेल्या पावलांबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच राज्यातील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी भाजपने टाकलेल्या या डावाबाबत मोठे दावे करत आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत गेलेच नाहीत, तर त्यांचे डील ही मुख्यमंत्रीपदासाठी झाली असल्याचा दावा अनेक मोठ्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, या घटनाक्रमामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद कमी होईल, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच, आता त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी अजित पवारांना आधीच बहुमत असलेल्या सरकारमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अजितदादांच्या सोबत येण्याने एनडीए तर मजबूत होईलच, शिवाय भाजपला भागीदार म्हणून शिंदे यांना पर्याय उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत भाजप आता शिंदेंचा पत्ता कट करु शकते, असे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांकडे तब्बल 40 आमदारांचे समर्थन आहे, असा ते दावा करत आहेत. राष्ट्रवादीच्या काही खासदारांचंही त्यांना समर्थन असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या विरोधात उभी असलेल्या महाविकास आघाडीतही फूट पडण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की, लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. अशातच अजित पवारांच्या रुपाने भाजपने खेळलेला नवा डाव त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान, अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवलेली नसून पुन्हा राष्ट्रवादीला बळ देणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी काय-काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार ः खा. संजय राऊत – अजित पवार यांची भाजपसोबत मुख्यमंत्री पदाची डील झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वारंवार करत आहेत. अजित पवारांच्या शपथविधीनंतर संजय राऊतांनी शिंदे सरकारवर निशाणा साधत एकनाथ शिंदेसह 16 आमदार लवकरच अपात्र होणार आहेत, त्यामुळेच राजकारणात ट्विस्ट आला आहे. त्यानंतर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याच भाकीतही राऊतांनी केले होते. तसेच, भाजप आणि अजित पवारांमध्ये सीएम पदासाठीच करार झाला असून सध्याचे मुख्यमंत्री लवकरच घरी जातील, याचा पुनरुच्चार संजय राऊतांनी सोमवारी बोलतांना केला आहे.

COMMENTS