Ahmednagar Sex Racket Exposed : हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ahmednagar Sex Racket Exposed : हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा (Video)

अहमदनगर शहरात सुरु असलेले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने सावेडीतील वाणीनगर व केडगावमध

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जाहीर
मित्राच्या वाढदिवसाला नेत पतीने पत्नीवर करवला सामूहिक बलात्कार | LOKNews24
मोबाईल टॉवरची अंतिम सुनावणी होईपर्यंत प्रेक्षपण राहणार बंद

अहमदनगर शहरात सुरु असलेले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने सावेडीतील वाणीनगर व केडगावमधील अंबिकानगर भागात सुरु असलेल्या या रॅकेटवर छापा टाकला आहे.

बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ३ पीडित परप्रांतीय बंगाली महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

वाणीनगर येथील छाप्याबाबत पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी फिर्याद दिली आहे. तर केडगाव येथील छाप्याबाबत पोलीस नाईक शाहिद शेख यांनी फिर्याद दिली आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.

या दोन्ही कारवायांची वैशिष्ट्य म्हणजे उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट  घेऊन महिलांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.अहमदनगर शहरामध्ये बऱ्याच काळानंतर या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे अहमदनगर शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

COMMENTS