आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा दुसरा दिवस आहे . आज जुन्नरमधील ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन
आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा दुसरा दिवस आहे . आज जुन्नरमधील ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन तिथे ध्वजपूजन संपन्न झाल्यानंतर स्वराज्य ध्वज यात्रेने संगमनेरच्या पेमगिरी किल्ल्याकडे कूच केले. शहाजी महाराज आणि जिजामाता यांच्या वास्तव्याने हा किल्ला पुनित झाला आहे. तसेच येथे श्री पेमादेवीचे मंदिरही आहे. तिथे युवक जिल्हा अध्यक्ष कपिल पवार, अकोले अगस्ती साखर कारखानाचे संचालक मिलिंद कानवडे, सुरेश गडाख, आदींच्या उपस्थितीत स्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले.
कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी पुष्पाभिषेकासह ध्वजाचे पूजन करून स्वराज्यध्वज यात्रेचा शुभारंभ काल अहमदनगर येथून केला.
हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी लोकसहभागातून परंतु कोरोनासाथी रोगाच्या संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून ध्वज यात्रा पुढील ३७ दिवस प्रवास करणार आहे असे यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
COMMENTS