Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यात गायींचा मृत्यू चिंताजनक – डॉ. पोपटराव पवार

तातडीने मदत व संशोधनाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अहिल्यानगर :  जिल्ह्यातील हिवरे बाजार, दैठणे गुंजाळ आणि टाकळी खातगाव परिसरात गायींना अज्ञात आजाराच

शेखर वाकचौरे टायकून अँवार्ड 2024 ने सन्मान
Parner : चित्रा वाघ यांची तहसीलदार देवरे यांना भेट ही आर्थिक देवाण-घेवाणीतून l Lok News24
30 एप्रिलपर्यंत सरसकट संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय

तातडीने मदत व संशोधनाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहिल्यानगर :  जिल्ह्यातील हिवरे बाजार, दैठणे गुंजाळ आणि टाकळी खातगाव परिसरात गायींना अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने गेल्या काही दिवसांत सुमारे ३० गायींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 या पार्श्वभूमीवर आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष डॉ. पोपटराव पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. निवेदनाच्या प्रती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, प्रधान सचिव डॉ. रामास्वामी एन. तसेच पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण देवरे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

  हिवरे बाजार (ता. नगर), दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) आणि टाकळी खातगाव या सुमारे पाच किलोमीटर परिघातील गावांमध्ये गायींच्या मृत्यूची मालिका सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाचे पथक, पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन रक्त, चारा, पाणी तसेच शवविच्छेदनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. मात्र, अद्याप आजाराचे नेमके निदान झालेले नसल्याने पशुपालकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे.

दरम्यान, सध्या जिल्हा परिषदेकडून मृत गायीमागे केवळ १० हजार रुपयांची मदत दिली जाते. एका दुभत्या गायीची बाजारभावानुसार किंमत १ ते १.५ लाख रुपये असल्याने ही मदत अपुरी असल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले आहे. शासनाने किमान ७५ टक्के नुकसान भरपाई तातडीने मंजूर करावी, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.

 यासोबतच, पिकांवरील तणनाशकांचा वापर, रासायनिक खतांचा अतिवापर किंवा खाद्यातील युरियामुळे चारा विषबाधा होत आहे का, याची कृषी व पशुसंवर्धन विद्यापीठामार्फत तातडीने तांत्रिक चाचणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.“शेतकरी आधीच संकटात आहे. त्यात दुभत्या जनावरांचा असा मृत्यू होणे हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे. शासनाने याकडे युद्धपातळीवर लक्ष देऊन तातडीचे निर्णय घ्यावेत,” असे डॉ. पोपटराव पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

COMMENTS