जुनी पेन्शन व अनुदानवाढीसाठी आंदोलन ; मुंबईतील शिक्षक आंदोलनास नगरचा पाठिंबा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुनी पेन्शन व अनुदानवाढीसाठी आंदोलन ; मुंबईतील शिक्षक आंदोलनास नगरचा पाठिंबा

अहमदनगर/प्रतिनिधी : जुनी पेन्शन योजना सुरु केली जावी तसेच अघोषित शाळांना अनुदान घोषित करा या मागण्यांसाठी शिक्षक परिषद व मुख्याध्यापक संघाने मंगळवारी

मंत्री विखे आणि थोरातांची राजकीय मिलीभगत
संगमनेर तालुक्यात महिलेचा खुन; आरोपीस अटक
सदाशिव लोखंडें यांच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

अहमदनगर/प्रतिनिधी : जुनी पेन्शन योजना सुरु केली जावी तसेच अघोषित शाळांना अनुदान घोषित करा या मागण्यांसाठी शिक्षक परिषद व मुख्याध्यापक संघाने मंगळवारी मुंबईत जाऊन आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनास शिक्षक परिषद व मुख्याध्यापक संघाने पाठिंबा दिल्याचे प्राचार्य सुनील पंडित यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर न्याय हक्कासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षक संघटनांनी धरणे व उपोषण आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास शैक्षणिक क्षेत्रातील अनेक संघटनांनी पाठिंबा देत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली आहे. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व मुख्याध्यापक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या ठिकाणी मार्गदर्शन करीत पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी जुनी पेन्शन योजना समन्वय राज्य समितीच्या संगीता शिंदे, सचिव महेंद्र हिंगे, दिलीप रोकडे, जयमाला भोरे, अनिता सरोदे, विजय गरड, शिक्षक परिषदेचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव तसेच मुख्याध्यापक संघाच्या सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. यावेळी प्राचार्य पंडित म्हणाले, राज्यातील सर्व मराठी माध्यमाच्या शाळा वाचवायच्या असतील तर दिनांक 1/11/2005 पूर्वीच्या शिक्षक-शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना सुरु करणे गरजेचे आहे तसेच अघोषित शाळांना अनुदान घोषित केले जावे. अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% व 80% शाळा तुकड्यांना 100% अनुदान घोषित करा या मागण्यांसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यासाठी विविध अधिकारी,लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिली. आंदोलने करून मोर्चेही काढले परंतु या मागण्या आजपर्यंत मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आधिवेशन काळात मुंबई येथे शिक्षकांनी सुरु केलेल्या आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत आवाज पोहचविण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे. त्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्यावतीने सक्रीय पाठींबा देताना असल्याचे प्राचार्य पंडित यांनी सांगितले.

COMMENTS