सांगली / प्रतिनिधी : गेल्या तीन दिवसापासून वनविभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाला गुंगारा देणारा गवा अखेर सांगली शहरांमध्ये आला. सध्या त्याने सांगली शहरात
सांगली / प्रतिनिधी : गेल्या तीन दिवसापासून वनविभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाला गुंगारा देणारा गवा अखेर सांगली शहरांमध्ये आला. सध्या त्याने सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मार्केट यार्ड परिसरात ठाण मांडले आहे. गव्याला पकडण्यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांची तारांबळ उडाली आहे.
शनिवार, दि. 24 रोजी रात्री गवा सांगलीवाडी येथे आला होता. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर गव्याचे दर्शन झाले. तो शहरात घुसू नये यासाठी नागरिक आणि शासकिय यंत्रणेने प्रयत्न केले. परंतू प्रारंभीला सांगलीवाडीतील चिंचबाग आणि त्यानंतर कदमवाडी रस्त्यावरील उसाच्या शेतात गव्याने आश्रय घेतला होता. उसाच्या शेतातून गवा गेला असावा, अशी शक्यता वर्तवली जात असताना सोमवारी तो पुन्हा सांगलीवाडीमधील नागरिकांना दिसला. त्यामुळे गव्याला पकडण्यासाठी यंत्रणांची पळापळ सुरू झाली होती. गवा सलग तीन दिवस उसाच्या शेतात थांबला होता. मध्यरात्री मात्र सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मार्केट यार्ड परिसराकडे आपला मोर्चा वळवला. सध्या एका चिंचोळ्या गल्लीमध्ये शिरला आहे. गवा त्या गल्लीतून बाहेर पडू नये म्हणून बॅरेकेट लावण्यात आली आहेत. नागरिकांचा गोंधळ झाल्यास गवा सैरभैर होऊ शकतो. यासाठी त्याला पाहण्यासाठी कोणी येऊ नये व गोंधळ करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूर शहरातील रहिवासी भागात गवा आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर काही लोक जखमी झाले होते. वनविभागाने नागरी वस्तीतून गव्याला बाहेर काढण्याची मोहिम आखली आहे. तो पर्यंत गव्याला भुजवण्याचे कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS