Homeताज्या बातम्यामनोरंजन

मराठमोळा अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

तुम्हाला रामायण मालिकेतील भरत ची भुमिका साकारणारे अभिनेते संजय जोग ठाऊक असतील. मराठमोळे अभिनेते संजय जोग यांनी रामायण मालिकेत साकारलेली भुमिका अज

वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर शाकिब हसनला चाहत्यांकडून मारहाण ?
‘तुझे लग्न दुसरीकडे कसे होते ते मी बघतेच ; प्रेयसीच्या धमकीने प्रियकराची आत्महत्या I LOKNews24
विदेशी भांडवलदारांची चोपदार असणारी समिती !

तुम्हाला रामायण मालिकेतील भरत ची भुमिका साकारणारे अभिनेते संजय जोग ठाऊक असतील. मराठमोळे अभिनेते संजय जोग यांनी रामायण मालिकेत साकारलेली भुमिका अजरामर झाली. संजय जोग यांचा मुलगा रणजित जोग हा सुद्धा मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. रणजितने गुपचुप दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. रणजितने प्रणाली धुमाळ सोबत मोजक्याच मित्रमंडळींसमवेत हे लग्न केले. २०१३ साली रणजितने संयुक्ता सोबत पहिले लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षातच काही व्यक्तिगत कारणामुळे त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री प्रणाली धुमाळ सोबत रणजितचे हे दुसरे लग्न आहे. रणजित च्या लग्नाची बातमी समजताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रणजित जोगचे कुटुंब चार पिढ्यांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. रणजितचे वडील संजय जोग हे मराठी हिंदी सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. नाना जोग हे रणजितचे पणजोबा हे मराठी सृष्टीतील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जात. संजय जोग यांनी १९९५ साली किडनी विकाराने या जगाचा निरोप घेतलेला आहे. रणजितची आई नीता जोग या पेशाने वकील आहेत.

COMMENTS